ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
तळोशी हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. तळोशी हे गाव पशुपालन व दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, नाशिक शहरासह इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक दूधपुरवठा करणारे गाव म्हणून याची ओळख आहे. गावाजवळील गोंदे व वाडीवऱ्हे MIDC मुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. गावात वाचनालय, जिल्हा परिषद शाळा, जनता विद्यालय (घोटी), उपप्राथमिक आरोग्य केंद्र (नांदगावसदो), कार्यक्रमासाठी सभागृह, तसेच घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध आहे. प्रत्येक घराला रस्ता पोहोचलेला असून सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जाते. गाव १००% हगणदारीमुक्त आहे. गावातील मंदिरांमध्ये "मारुती मंदिर" व "भवानी माता मंदिर" हे प्रमुख असून, नवरात्रात येथे यात्रेचे आयोजन होते. शैक्षणिक सुविधेत तळोशी आणि ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळा असून, इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. अंगणवाड्या कार्यरत असून त्यांना पूर्णवेळ कर्मचारी उपलब्ध आहेत.
तळोशी २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| मापदंड | माहिती |
|---|---|
| ग्रामपंचायतीचे नाव | तळोशी |
| तालुका | इगतपुरी |
| जिल्हा | नाशिक |
| स्थापना वर्ष | १९६२ |
| लोकसंख्या (२०११) | १७९६ |
| पुरुष | ८९१ |
| स्त्रिया | ९०५ |
| कुटुंब संख्या | ३२० |
| मतदार संख्या | १५४५ (स्त्री – ७६७, पुरुष – ७८७) |
| प्रमुख व्यवसाय | भात लागवड, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला शेती |
| ग्रामसेवक | श्री. आनंदसिंग भिमसिंग पाटील |
| प्रशासक | श्री. नितीन एकनाथ गांगोडे |
| पाणीपुरवठा कर्मचारी | श्री. बाळु निवृत्ती गीते |
| केंद्र चालक | श्रीमती योगिता जयराम शेळके |
| शाळा | जि.प. शाळा तळोशी व तळोशीवाडी |
| अंगणवाडी | २ (१ गावात, १ वाडीत) |
| प्रमुख मंदिरे | मारुती मंदिर, भवानी माता मंदिर |
| पिन कोड | ४२२४०३ |
| पोस्टल मुख्यालय | इगतपुरी |
| जवळची गावे | तळोघ, पिंपरी, नांदगावसदो, घोटी, इगतपुरी |
| सांडपाणी व्यवस्थापन | शौचखड्यांमार्फत |
| शौचालय सुविधा | १००% हगणदारीमुक्त गाव |
| पाणी पुरवठा | नळाद्वारे घराघरात |
| स्मशानभूमी | उपलब्ध |
| सभामंडप | उपलब्ध |
| वाचनालय | उपलब्ध |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |